तुकाराम गाथा - अभंग १६

प्रकाशन: संपादक मंडळ | ३० जून २००५

तुकाराम गाथा - अभंग १६ | Tukaram Gatha - Abhang 16

तुकाराम गाथा अभंग १६ - [Tukaram Gatha - Abhang 16] संत तुकाराम महाराज यांनी रचलेल्या अभंगांची गाथा शब्द आणि चित्र/Graphic/Photo/Image स्वरूपात.

सर्व सुख आम्ही भोगूं सर्व काळ ।
तोडियेलें जाळ मोहपाश ॥१॥

याचसाठी सांडियेले भरतार ।
रातलों या परपुरुषाशीं ॥२॥

तुका म्हणे आतां गर्भ नये धरूं ।
औषध जें करूं फळ नव्हे ॥३॥संत तुकाराम महाराज