तुकाराम गाथा - अभंग १४

प्रकाशन: संपादक मंडळ | २८ जून २००५

तुकाराम गाथा - अभंग १४ | Tukaram Gatha - Abhang 14

तुकाराम गाथा अभंग १४ - [Tukaram Gatha - Abhang 14] संत तुकाराम महाराज यांनी रचलेल्या अभंगांची गाथा शब्द आणि चित्र/Graphic/Photo/Image स्वरूपात.

क्षणभरी आम्ही सोसिलें वाईट ।
साधिलें अवीट निजसुख ॥१॥

सांडी मांडी मागें केल्या भरोवरी ।
अधिकची परी दुःखाचिया ॥२॥

तुका म्हणे येणें जाणें नाहीं आतां ।
राहिलों अनंताचिये पायीं ॥३॥संत तुकाराम महाराज