तुकाराम गाथा - अभंग १३

प्रकाशन: संपादक मंडळ | २७ जून २००५

तुकाराम गाथा - अभंग १३ | Tukaram Gatha - Abhang 13

तुकाराम गाथा अभंग १३ - [Tukaram Gatha - Abhang 13] संत तुकाराम महाराज यांनी रचलेल्या अभंगांची गाथा शब्द आणि चित्र/Graphic/Photo/Image स्वरूपात.

दुजा ऐंसा कोण बळी आहे आतां ।
हरि या अनंता पासूनिया ॥१॥

बळियाच्या आम्ही जालों बळिवंता ।
करूं सर्व सत्ता सर्वांवरी ॥२॥

तुका म्हणे आम्ही जिवाच्या उदारा ।
जालों प्रीतिकरा गोविंदासी ॥३॥संत तुकाराम महाराज