तुकाराम गाथा - अभंग १२

प्रकाशन: संपादक मंडळ | २६ जून २००५

तुकाराम गाथा - अभंग १२ | Tukaram Gatha - Abhang 12

तुकाराम गाथा अभंग १२ - [Tukaram Gatha - Abhang 12] संत तुकाराम महाराज यांनी रचलेल्या अभंगांची गाथा शब्द आणि चित्र/Graphic/Photo/Image स्वरूपात.

न देखें न बोलें नाइकें आणीक ।
बैसला हा एक हरि चित्तीं ॥१॥

सासुरें माहेर मज नाहीं कोणी ।
एक केलें दोन्ही मिळोनियां ॥२॥

आळ आला होता आम्ही भांडखोरी ।
तुका म्हणे खरी केली मात ॥३॥संत तुकाराम महाराज