तुकाराम गाथा - अभंग ११

प्रकाशन: संपादक मंडळ | २५ जून २००५

तुकाराम गाथा - अभंग ११ | Tukaram Gatha - Abhang 11

तुकाराम गाथा अभंग ११ - [Tukaram Gatha - Abhang 11] संत तुकाराम महाराज यांनी रचलेल्या अभंगांची गाथा शब्द आणि चित्र/Graphic/Photo/Image स्वरूपात.

विसरले कूळ आपुला आचार ।
पती भावे दीर घर सोय ॥१॥

सांडिला लौकिक लाज भय चिंता ।
रातलें अनंता चित्त माझें ॥२॥

मज आतां कोणी आळवाल झणी ।
तुका म्हणे कानीं बहिरी जालें ॥३॥संत तुकाराम महाराज