तुकाराम गाथा - अभंग १

प्रकाशन: संपादक मंडळ| १५ जून २००५

तुकाराम गाथा - अभंग १ | Tukaram Gatha - Abhang 1

तुकाराम गाथा अभंग १ - [Tukaram Gatha - Abhang 1] संत तुकाराम महाराज यांनी रचलेल्या अभंगांची गाथा शब्द आणि चित्र/Graphic/Photo/Image स्वरूपात.

समचरणदृष्टी विटेवरी साजिरी ।
तेथें माझी हरी वृत्ति राहो ॥१॥

आणीक न लगे मायिक पदार्थ ।
तेथें माझें आर्त नको देवा ॥ध्रु॥

ब्रम्हादिक पदें दुःखाची शिराणी ।
तेथें दुश्चित झणी जडों देसी ॥२॥

तुका म्हणे त्याचे कळले आम्हां वर्म ।
जे जे कर्मधर्म नाशवंत ॥३॥संत तुकाराम महाराज