MarathiMati.com - Android App on Google Play Store

मराठी सुविचार

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १ फेब्रुवारी २००८

मराठी सुविचार | Marathi Suvichar | Marathi Good Thoughts

काळ्याकुट्ट रात्रीनंतर उद्याची लख्ख पहाट असतेच.सुविचार

काळजाची प्रत्येक जखम भरून येते कारण काळ दुःखावर मायेची फुंकर घालत असतो.सुविचार

एक साधा विचारसुध्दा तुमचं आयुष्य उजळवू शकतो म्हणून नेहमी नवे विचार मिळवत रहा.सुविचार

हे देवा, मला खूप खूप आव्हानं दे व ती पेलण्यासाठी प्रचंड शक्ती दे !सुविचार

उगवणारा प्रत्येक दिवस उमलणारा हवा.सुविचार

या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे.सुविचार

तुम्हाला मोठेपणी कोणं व्हायचंय ते आजच ठरवा....आत्ताच !सुविचार

केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहीजे.सुविचार

दुसऱ्यांच्या गुणाचं कौतुक करायलाही मन मोठं लागतं.सुविचार

माणूस म्हणजे गुण व दोष यांचे मिश्रण आहे.सुविचार

प्रत्येक क्षण अपल्याला काही ना काही शिकवत असतो.सुविचार

व्यायामामुळे बुध्दी आणि मन दोहोंचे सामर्थ्य प्रभावी होते.सुविचार

काट्याविना गुलाबाचा कोमलपणा व्यर्थ असतो.सुविचार

दुःख हे कधीच दागिन्यासारखं मिरवू नका; वाटू शकलात तर आपला आनंद वाटा.सुविचार

शक्तीचा उपयोग नेहमी शहाणपणाने करा. क्रोधाच्या मार्गाने ती वाया घालवू नका.सुविचार

जग भित्र्याला घाबरवते आणि घाबरवणाऱ्याला घाबरते.सुविचार

दुःख हे बैलालासुध्दा कोकिळेसारखं गायला लावतं.सुविचार

शिकणाऱ्याला शिकवावं लागत नाही; तो स्वतःहून शिकतो.सुविचार

जग हे कायद्याच्या भीतीने चालत नाही ते सद्विचाराने चालते.सुविचार

परिस्थितिला शरण न जाता परिस्थितीवर मात करा.सुविचार

MarathiMati.com - Android App on Google Play Store