MarathiMati.com - Android App on Google Play Store

मराठी सुविचार

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १ फेब्रुवारी २००८

मराठी सुविचार | Marathi Suvichar | Marathi Good Thoughts

आयुष्यात असं काहीतरी मिळवा जे तुमच्या पासून कुणीही चोरून घेऊ शकत नाही.सुविचार

बदलण्याची संधी नेहमी असते पण बदलण्यासाठी तूम्ही वेळ काढला का ?सुविचार

कलेशिवाय जीवन म्हणजे सुगंधाशिवाय फूल आणि प्राणाशिवाय शरीर !सुविचार

टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण मिळत नाही.सुविचार

नेहमी तत्पर रहा; बेसावध आयुष्य जगू नका.सुविचार

यश न मिळणे याचा अर्थ अपयशी होणे असा नाही.सुविचार

आयुष्यात खूपदा बुध्दी जिंकते; ह्रदय हरतं पण बुध्दी जिंकूनही हरलेली असते आणि ह्रदय हरूनदेखील जिंकलेलं असतं.सुविचार

खरं आणि खोटं यात केवळ चार बोटांचं अंतर आहे. आपण कानांनी ऎकतो ते खोटं आणि डोळ्यांनी पाहतो ते खरं.सुविचार

जगी सर्व सुखी असा कोन आहे; विचारी मना तुच शोधूनी पाहे.सुविचार

प्रत्येक बाबतीत दुसऱ्याच अनुकरण करु नका; स्वतःची वेगळी ओळख निर्माण करा.सुविचार

स्वातंत्र्य म्हणजे संयम; स्वैराचार नव्हे.सुविचार

आयुष्यातला खरा आंनद भावनेच्या ओलाव्यात असतो.सुविचार

माणसाने आपल्या आयुष्यात सुख-दुःख मानापमान, स्फूर्ती-निंदा, लाभ हानी, प्रिय-अप्रिय ह्या गोष्टी समान समजाव्यात.सुविचार

जीवनातील प्रत्येक क्षणी शिकणं म्हणजे शिक्षण.सुविचार

तन्मयता नसेल तर; विद्वत्ता व्यर्थ आहे.सुविचार

शिक्षण हे साधन आहे; साध्य नव्हे.सुविचार

हसा, खेळा पण शिस्त पाळा.सुविचार

आयुष्यात काय गमावलंत ह्यापेक्षा काय कमावलंत ह्याचा विचार करा.सुविचार

स्वतः जगा आणि दुसऱ्यालाही जगू द्या.सुविचार

तूच आहेस तूझ्या जीवनाचा शिल्पकार !सुविचार

MarathiMati.com - Android App on Google Play Store