MarathiMati.com - Android App on Google Play Store

मराठी सुविचार

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १ फेब्रुवारी २००८

मराठी सुविचार | Marathi Suvichar | Marathi Good Thoughts

लक्षात ठेवा-आयुष्यात कुठलीच गोष्ट कायमची आपली नसते.सुविचार

कधी कधी आपण ज्यांच्यावर खूप प्रेम करतो तीच माणसं आपल्यापासून फार दूर जातात.सुविचार

जे आपले नाही त्याच्यावर कधीच हक्क सांगू नका.सुविचार

पुढचा आपल्याशी चांगला वागेल या अपेक्षेने त्याच्याशी चांगलं वागू नका.सुविचार

आयुष्यात भेटणारी सगळीच माणसे सारखी नसतात.सुविचार

गुणांचं कौतुक उशीरा होतं; पण होतं !सुविचार

कुठल्याही कामाला अंतःकरणाचा उमाळा लागतो.सुविचार

स्वतःचा अवगुण शोधणं हीच गुणांची पूर्तता !सुविचार

ज्यादिवशी आपली थोडीही प्रगती झाली नाही तो दिवस फुकट गेला अस समजा.सुविचार

जो स्वतःवर प्रेम करू शकत नाही तो जगावर काय प्रेम करणार !सुविचार

सृजनातला आनंद कल्पनेच्या पलीकडचा असतो.सुविचार

श्रध्दा असली की सृष्टीतल्या प्रत्येक गोष्टीत देव दिसतो.सुविचार

आनंदी मन, सुदृढ शरीर आणि अध्यात्मिक श्रध्दा ह्या तिनही गोष्टी लाभणं म्हणजे अमृत मिळणं.सुविचार

एकांतात मिळणाऱ्या क्षणांचं आपण काय करतो यावर आयुष्याकडे पाहाण्याचा आपला दृष्टीकोन व्यक़्त होतो.सुविचार

प्रेमाला आणि द्वेषालाही प्रेमानेच जिंका.सुविचार

आपण चुकतो तिथे सावरतो तोच खरा मित्र !सुविचार

आपला जन्म होतो तेव्हा आपण रडत असतो आणि लोक हसत असतात. मरताना आपण असं मरावं की आपण हसत असू आणि लोक रडत असतील !सुविचार

स्वतःची चूक स्वतःला कळली की बरेच अनर्थ टळतात.सुविचार

अश्रुंनीच ह्र्दये कळतात आणि जुळतात.सुविचार

हक्क आणि कर्तव्य या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.सुविचार

MarathiMati.com - Android App on Google Play Store