MarathiMati.com - Android App on Google Play Store

मराठी सुविचार

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १ फेब्रुवारी २००८

मराठी सुविचार | Marathi Suvichar | Marathi Good Thoughts

तुम्ही जिथे जाल तिथे तुमची गरज निर्माण करा.सुविचार

सगळेच निर्णय मनाने घेऊ नका, काही निर्णय बुध्दीलाही घेऊ द्या.सुविचार

काळ्याकुट्ट रात्रीनंतर सुर्य उगवतोच.सुविचार

लखलखते तारे पाहण्यासाठी आपल्याला अंधारातच रहावं लागतं.सुविचार

चांगली कविता माणसाला संवेदनाक्षम बनवते.सुविचार

तुमची उक्ती आणि कृती यात भेद ठेवू नका.सुविचार

भुतकाळ आपल्याला आठवणींचा आनंद देतो, भविष्यकाळ आपल्याला स्वप्नांचा आनंद देतो पण आयुष्याचा आनंद फक्त वर्तमानकाळच देतो.सुविचार

चांगला माणूस घडवणे हेच शिक्षणाचे खरे ध्येय आहे.सुविचार

आयुष्यात सर्वात जास्त विश्वास परमेश्वरावर ठेवा.सुविचार

उलटा केलेला पिरॅमिड कधीच उभा राहू शकत नाही.सुविचार

पोहरा झुकल्याशिवाय विहिरीतलं पाणी पोहऱ्यात जात नाही.सुविचार

अत्तर सुगंधी व्हायला फुले सुगंधी असावी लागतात.सुविचार

मित्राच्या मृत्यूपेक्षा मैत्रीचा मृत्यू अधिक दुःखदायक असतो.सुविचार

संकटं तुमच्यातली शक्ती, जिद्द पाहण्यासाठीच येत असतात.सुविचार

रागाला जिकंण्याचा एकमेव उपाय - मौन !सुविचार

अति आशा हे दुःखाचं मूळ कारण आहे.सुविचार

अंथरूण बघून पाय पसरा.सुविचार

कधी कधी हक्क मागून मिळत नाहीत. ते मिळवावे लागतात.सुविचार

तुम्हाला ज्या विषयाची माहिती आहे त्याविषयी कमी बोला, आणि ज्या विषयाची माहिती नाही त्या विषयी मौन पाळा.सुविचार

अतिशहाणा त्याचा बैल रिकामा.सुविचार

MarathiMati.com - Android App on Google Play Store