MarathiMati.com - Android App on Google Play Store

मराठी सुविचार

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १ फेब्रुवारी २००८

मराठी सुविचार | Marathi Suvichar | Marathi Good Thoughts

कविता म्हणजे भावनांचं चित्र! सुविचार

संभ्रमाच्या वेळी नेहमी आपल्या कर्तव्याला प्राधान्य द्या.सुविचार

तुम्ही जेवढं इतरांना द्याल तेवढंच किंबहुना त्याच्या कित्येक पटीने देव तुम्हाला देईल.सुविचार

ज्याच्यामधे मानवता आहे तोच खरा मानव ! सुविचार

स्वत:च्या स्वार्थासाठी दुसऱ्याचा वापर कधी करु नका आणि स्वत:चा वापर कुणाला करु देऊ नका.सुविचार

अनुभवासारखा दुसरा गुरू नाही.सुविचार

तुलना करावी पण अवहेलना करू नये.सुविचार

समाधानी राहण्यातच आयुष्यातले सगळ्यात मोठे सुख आहे.सुविचार

आयुष्यातल्या कोणत्याही क्षणी क्रोधाचे गुलाम बनू नका.सुविचार

मनात आणलं तर या जगात अशक्य असं काहीच नाही.सुविचार

चेहरा हा आपल्या व्यक्तिमत्वाचा आरसा असतो.सुविचार

व्यर्थ गोष्टींची कारणे शोधू नका, आहे तो परिणाम स्विकारा.सुविचार

आवडतं तेच करू नका, जे करावं लागतं त्यात आवड निर्माण करा.सुविचार

तुम्ही किती जगलात ह्यापेक्षा कसं जगलात याला जास्त महत्त्व आहे.सुविचार

अश्रू येणं हे माणसाला ह्रदय असल्याचं द्योतक आहे.सुविचार

विचारवंत होण्यापेक्षा आचारवंत व्हा.सुविचार

मरण हे अपरिहार्य आहे त्याला भिऊ नका.सुविचार

आयुष्यात प्रेम करा, पण प्रेमाचं प्रदर्शन करू नका.सुविचार

आयुष्यात कुठलीच नाती ठरवून जोडता येत नाही.सुविचार

प्रायश्चित्तासारखी दुसरी शिक्षा नाही.सुविचार

MarathiMati.com - Android App on Google Play Store