मराठी सुविचार

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १ फेब्रुवारी २००८

मराठी सुविचार | Marathi Suvichar | Marathi Good Thoughts

गरिबी असूनही दान करतो तो खरा दानशूर.मराठीमाती सुविचार कोष

स्वार्थरहीत आणि खरीखुरी सेवा हीच खरी प्रार्थना.मराठीमाती सुविचार कोष

प्रार्थना म्हणजे ईश्वराच्या जवळ जाण्याची शक्ती.मराठीमाती सुविचार कोष

आपले सौख्य हे आपल्या विचारांवर अवलंबून असते.मराठीमाती सुविचार कोष

जे घाईघाईने वर चढू पाहतात ते कोसळतात.मराठीमाती सुविचार कोष

सद्‍गुणांना कधीच वार्धक्य येत नाही.मराठीमाती सुविचार कोष

उषःकाल कितीही चांगला असला तरी सूर्याला तिथे फार काळ थांबता येत नसतं.मराठीमाती सुविचार कोष

लज्जा हा सौंदर्याचा अलंकार आहे.मराठीमाती सुविचार कोष

मोहाचा पहिला क्षण, ही पापाची पहिली पायरी असते.मराठीमाती सुविचार कोष

जीवन नेहमीच अपूर्ण असते आणि ते अपूर्व असण्यातच त्याची गोडी साठवलेली असते.मराठीमाती सुविचार कोष

सत्याला शपथांच्या टेकूची गरज नसते.मराठीमाती सुविचार कोष

जगात सारी सोंगे करता येतात, पण पैशाच सोंग करता येत नाही.मराठीमाती सुविचार कोष

संकटं टाळणं माणसाच्या हाती नसतं पण संकटाचा सामना करणं त्याच्या हातात असतं.मराठीमाती सुविचार कोष

जूनी खपली काढून बुजलेल्या जखमा ताज्या करण्यात शहाणपणा नसतो.मराठीमाती सुविचार कोष

सौंदर्य, सुस्वभाव यांची बेरीज करा, मैत्रीतून मत्सर वजा करा, प्रेमाला शुध्द अंतःकरणाने गुणा, परमनिंदेचा लघुत्तम काढा, सुविचारांचा वर्ग करा, दया, क्षमा, शांती, परमार्थ यांचे समीकरण सोडवा... हेच आपल्या सुखी आयुष्याचे गणित आहे.मराठीमाती सुविचार कोष

क्रांती तलवारीने घडत नाही; तत्वाने घडते.मराठीमाती सुविचार कोष

जो गुरू असेल, तो शिष्य असेलच. जो शिष्य नसेल, तो गुरू नसेल.मराठीमाती सुविचार कोष

जीवन हा एक पाण्याचा प्रवाह आहे, समुद्र गाठायचा असेल, तर खाचखळगे पार करावेच लागतील.मराठीमाती सुविचार कोष

जीवन ही एक जबाबदारी आहे. क्षणाक्षणाला दुसर्‍याला सांभाळत न्यावं लागतं.मराठीमाती सुविचार कोष

वैभव त्यागात असते, संचयात नाही.मराठीमाती सुविचार कोष