मराठी सुविचार

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १ फेब्रुवारी २००८

मराठी सुविचार | Marathi Suvichar | Marathi Good Thoughts

ऎकावे जनाचे करावे मनाचे.सुविचार

एका वेळी एकच काम आणि तेही एकाग्रतेने करा.सुविचार

केवळ ज्ञान असून उपयोग नाही, ते कसं आणि केव्हा वापरायचं याचंही ज्ञान हवं.सुविचार

बाह्यशत्रूपेक्षा बऱ्याच वेळी अंतःशत्रूचीच अधीक भीती असते.सुविचार

चिंता ही कुठल्याच दुःखावरचा उपाय होऊ शकत नाही.सुविचार

तलवारीच्या जोरावर मिळवलेलं राज्य तलवार असेतोवरच टिकतं.सुविचार

दुःखातील दुःखिताला सुख म्हणजे त्याच्या दुःखातला सहभाग होय.सुविचार

स्वातंत्र्य हा आपला जन्मसिध्द हक्क आहे पण त्याचा स्वैराचार होऊ न देणं हे आपलं आद्यकर्तव्य आहे.सुविचार

स्वतःला पुर्ण ज्ञानी समजणाऱ्याचा विकास खुंटला.सुविचार

त्रासाशिवाय विद्या मिळणे अशक्य आहे. नव्हे, त्रास कसा सहन करायचा हे शिकणे हीच विद्या !सुविचार

जगू शकलात तर चंदनासारखे जगा; स्वत: झीजा आणि इतरांना गंध द्या.सुविचार

दुबळी माणसे रडगाणी सांगण्यासाठीच जन्माला आलेली असतात.सुविचार

पाप ही अशी गोष्ट आहे जी लपवली की वाढत जाते.सुविचार

उद्याचा भविष्यकाळ वर्तमानाच्या त्यागातून निर्माण होत असतो.सुविचार

जो चांगल्या वॄक्षाचा आधार घेतो त्याला चांगलीच सावली लाभते.सुविचार

मरावे परी कीर्तीरूपे उरावे.सुविचार

आयुष्य जगून समजते; केवळ ऎकून , वाचून , बघून समजत नाही.सुविचार

मूर्ख माणसे आपापसात संभाषण करू लागली की शहाण्या माणसाने मौन धारण करणे योग्य.सुविचार

बचत म्हणजे काय आणि ती कशी करावी हे मधमाश्यांकडून शिकावं.सुविचार

तारूण्य म्हणजे जीवनाचा रचनाकाळ आहे.सुविचार