MarathiMati.com - Android App on Google Play Store

भाज्यांचे लोणचे

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १ जानेवारी २००८

भाज्यांचे लोणचे

आपल्याला मोहरीऐवजी शेंगदाणा तेल व लोणच्याचा मसाला वापरून हे भाज्यांचे लोणचे (Vegetables Pickle) करता येते.

जिन्नस


  • फ्लॉवरचे तुरे १ वाटी
  • सलगमचे साल काढून तुकडे १ वाटी
  • गाजर १ वाटी तुकडे
  • कांदा १
  • आले-लसूण बारीक चिरून २ टे.स्पून
  • तिखट
  • मीठ
  • गरम मसाला चवीनुसार
  • मोहरी पूड २ टी स्पून
  • व्हिनेगर २ टे.स्पून
  • साखर किंवा गूळ १/२ वाटी
  • मोहरी तेल २ टे.स्पून

पाककृती


भाज्या उकळत्या पाण्यात दोन मिनिटे शिजवून चाळणीवर ओताव्यात. कापडावर पसरून पूर्ण कोरड्या कराव्यात.

कांदा किसावा. गूळ व व्हिनेगर एकत्र करून मंद गॅसवर मधाप्रमाणे होईपर्यंत उकळावे. गार करावे.

तेल तापवून कांदे किस, लसूण, आले परतावे. लालसर झाले की उतरवून त्यात मीठ, मोहरी पूड, तिखट व गरम मसाला एकत्र करावा.

बरणीत भरून पुन्हा थोडं तेल घालावं. हे लोणचे उन्हात ठेवूनही करतात. कांदे ऐच्छिक आहे.

आपल्याला मोहरीऐवजी शेंगदाणा तेल व लोणच्याचा मसाला वापरून हे लोणचे करता येते. लिंबूरस घालून तात्पुरते लोणचे छान लागते.

MarathiMati.com - Android App on Google Play Store