व्हेज ब्रेड

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २८ जानेवारी २००८

व्हेज ब्रेड

व्हेज ब्रेड - [Veg Bread] टोमॅटो, काकडी सोबतच स्वीट कॉर्न आणि डाळिंबाचे दाणे व त्यावर चाट मसाला टाकून नविन प्रकारचा व्हेज ब्रेड मधल्या वेळेत किंवा न्याहारीला तसेच लहान मुलांना डब्यात देता येईल.

जिन्नस


  • ब्रेड
  • टोमॅटो
  • टोमॅटो केचअप
  • काकडी
  • स्वीट कॉर्न
  • चाट मसाला
  • शेव

पाककृती


एका ब्रेडच्या स्लाइसवर काकडी व टोमॅटोचे गोल काप ठेवा. नंतर ब्रेडच्या कडांवर अगदी थोडा केचप लावा.

मधोमध डाळिंबाचे दाणे, स्वीट कॉर्न दाणे टाका.

त्याचबरोबर आवश्यकतेनुसार चाट मसाला आणि शेव टाका. नंतर दुसर्‍या ब्रेडची स्लाइस त्यावर ठेवा.

टोस्टरमध्ये भाजा. गरमागरम सॉस सोबत खा.