व्हेज बिर्याणी

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १४ जानेवारी २००८

व्हेज बिर्याणी | Veg Biryani

व्हेज बिर्याणी - [Veg Biryani] सायंकाळच्या जेवणासाठी हलका फुलका पदार्थ करण्याची इच्छा असल्यास ‘व्हेज बिर्याणी’ आपल्यासाठी एक उत्तम पर्याय असु शकतो, उकळलेल्या भाज्या असलेला भाताचा हा प्रकार चवीला अत्यंत सुंदर लागतो.

जिन्नस


 • १ कप तांदुळ
 • ३ कप उकळलेल्या भाज्या (श्रावणघेवडा, गाजर, मटार इ.)
 • ५ कांदा
 • १ कप घट्ट दही
 • ३ चमचे केशर
 • २ चमचे दूध
 • १ चमचा साखर
 • चवीनुसार मीठ
 • ६ टेबलस्पून तूप
 • तळण्यासाठी तूप

वाटण्याचा मसाला


 • २ मोठे कांदे
 • ६ पाकळी लसूण
 • २ चमचे खसखस
 • २ चमचे शोप
 • १ इंच आले
 • ४ लाल मिरच्या
 • ४ हिरव्या मिरच्या
 • कडीपत्ता
 • लवंग
 • दालचिनी
 • ५ मिरे
 • २ टेबल स्पून किसलेले नारळ
 • १॥ चमचे जीरे
 • ३ चमचे धणे

पाककृती


तांदूळ मोकळे होईपर्यंत शिजवावे, तांदळात आणि भाजीत मीठ टाकावे.

एका कढईत कांदा लाल होईपर्यंत तळावा. कांदा काढून २ चमचे नारळाचे दुध टाकावे आणि केसर टाकुन मिसळेपर्यंत चाळावे. यात भात मिळवून घ्यावा.

एका वेगळ्या भांड्यात २ चमचे तूप गरम करून वाटलेला मसाला ३-४ मिनीट भाजावा. थंड करून मीठ, दही व साखर टाकावी.

एका वेगळ्या भांड्यात ४ चमचे तूप टाकावे. तसेच थोडासा कांदा टाकावा. आता भात टाकावा. तसेच भातावर थोडासा कांदा व वाटलेला मसाला टाकावा. त्यावर भाज्या पसरून घ्याव्यात.

उरलेला भात व कांदा टाकावा. वरून झाकुन द्यावे. ४०० फॅ वर २५ मिनीट शिजवावे. वाढण्याअगोदर एका मोठ्या प्लेटमध्ये उलटे टाकावे. गरम गरम वाढावे.