MarathiMati.com - Android App on Google Play Store

वाटल्या डाळीचे लाडू प्रकार २

द्वारे | प्रकाशक संपादक मंडळ | ९ जानेवारी २००८

वाटल्या डाळीचे लाडू प्रकार २

वाटल्या डाळीचे लाडू प्रकार २ - [Vatalya Daliche Ladoo Type 2] घरच्या घरी वाटलेल्या डाळीच्या लाडूची दुसरी पद्धत सोपी व चविष्ट आहे.

जिन्नस


  • ४ वाट्या हरभरा डाळ
  • ३ अर्धा वाट्या साखर
  • ८-१० वेलची पावडर
  • बेदाणा
  • बदाम (आवडत असल्यास)

पाककृती


डाळ स्वच्छ धुवून घ्यावी व नंतर ती पाण्यात भिजत टाकावी.

साधारण ४ तासांनी डाळ रोळीत उपसून ठेवावी व ५ मिनिटानंतर ती बारीक वाटून घ्यावी.

वाटलेली डाळ तुपावर गुलाबी रंगावर चांगली परतून घ्यावी.

पातेल्यात साखर घ्यावी. ती साधारण भिजेपर्यंत पाणी घालावे. पातेले गॅसवर ठेवावे.

साखर विरघळेपर्यंत मधून मधून हलवत राहावे. पाक गोळीबंद झाल्यावर खाली उतरवावा व त्यात भाजलेली डाळ टाकावी.

मिश्रण हलवून नंतर त्यात वेलची पूड, बेदाणा व बदामाचे काप टाकावे व ढवळून ठेवावे.

मिश्रण गार झाल्यावर त्याचे आपल्या आवडीप्रमाणे लाडू वळावेत.

MarathiMati.com - Android App on Google Play Store