वाटली डाळ

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ५ जानेवारी २००८

वाटली डाळ

वाटली डाळ - [Vatali Daal] तिखट आणि चटपटीत अशी चणाडाळ घालून केलेली ‘वाटली डाळ’ जिभेला चव देऊन जाईल.

जिन्नस


  • अर्धा किलो चणा डाळ
  • २ चमचे जिरे
  • ७-८ हिरव्या मिरच्या
  • वाटीभर-चिरलेली कोथिंबीर
  • १ वाटीभर किसलेले सुके खोबरे किंवा ओले खोबरे
  • १ चमचा साखर
  • मीठ चवीनुसार
  • १ वाटीभर तेल
  • फोडणीचे साहित्य

पाककृती


डाळ २ तास भिजत घालावी. पाण्यातून काढून ती वाटताना मिरच्या, १ चमचा जिरे, मीठ, साखर घालावी.

तेलाची फोडणी करून त्यात मोहरी, १ चमचा जिरे, अर्धा चमचा हिंग, अर्धा चमचा हळद घालून वाटलेला डाळीचा गोळा घालावा.

त्यातील पाणी आटून ती मोकळी होईपर्यंत परतावी. चांगली वाफ आली की उतरवावी.

खायला देताना डाळीत खोबरे व कोथिंबीर घालावी.