MarathiMati.com - Android App on Google Play Store

वरईच्या तांदळाचे अनारसे

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ६ जानेवारी २००८

वरईच्या तांदळाचे अनारसे

वरईच्या तांदळाचे अनारसे - [Varaichya Tandalache Anarase] सणासुदीला तसेच उपवासाला बदल म्हणुन खाता येईल असे खुसखुशीत ‘वरईच्या तांदळाचे अनारसे’ सर्वांना आवडतील.

जिन्नस


  • वरईचे तांदुळ
  • गूळ
  • तूप

पाककृती


वऱ्याचे तांदूळ ३ दिवस भिजत घाला. नंतर उपसून, अर्धवट वाळवून कुटून घ्या.

नंतर त्यात पिठाच्या निम्मा गूळ घाला.

१ वाटी पिठाला २ चमचे (सपाट) गूळ घाला व पीठ तयार करा.

दुसऱ्या दिवशी खसखशीवर थापून अनरसे करावे व तुपात तळावे.

MarathiMati.com - Android App on Google Play Store