MarathiMati.com - Android App on Google Play Store

वांग्याचे लोणचे

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १५ जानेवारी २००८

वांग्याचे लोणचे

वांग्याचे लोणचे - [Vangyache Lonache] वांगी, व्हिनेगर आणि मसाले टाकून चटपटीत वांग्याचे लोणचे बनवून रोटी किंवा चपातीसोबत खाऊ शकता.

जिन्नस


  • ७५० ग्रॅम लहान गोल वांगी
  • १० लसूण पाकळ्या
  • २ इंच आले
  • १५ लाल मिरच्या
  • ११५ मिली व्हिनेगर
  • ५ चमचे मोहरीची डाळ
  • १ चमचा हळद
  • १२५ ग्रॅम गूळ
  • ६ मोठे वेलदोडे
  • १ इंच दालचिनी
  • ४ लवंगा
  • १० मिऱ्याचे दाणे
  • ६ मोठे चमचे तेल
  • अर्धा चमचा मोहरी
  • ५ चमचे मीठ

पाककृती


आले-लसूण बारीक वाटून घ्यावे. लाल मिरच्या चमचाभर व्हिनीगरमधे बारीक वाटाव्या.

गूळ व्हिनीगरमध्ये विरघळवून ठेवावा.

वांगी धुवून पुसून ठेवावी. व त्यांचे १ सें.मी. जाड काप चिरून ठेवावे.

कल्हईच्या पातेल्यात तेल तापले की मोहरी व हळद घालून त्यावर आले-लसूण तांबूस होईपर्यंत परतावी.

त्यात वांग्याचे काप घालून हलक्या हाताने पातेलीत घालून सोडावे. वांगी मंदाग्निवर शिजू द्यावीत.

एकीकडे वेलची, लवंगा, दालचिनी व मिरी यांची बारीक पूड करावी.

वांगी मधूनच एकदोनदा झाऱ्याने अलगद ढवळावीत. वांगी शिजली की गुळाचे मिश्रण घालावे.

दाटसर रस होईपर्यंत शिजवावे. नंतर लवंग-दालचिनी इत्यादीची पूड घालावी.

मोहरीची डाळ व मीठ घालावे. खाली उतरवून लोणचे गार होऊ द्यावे.

नंतर काचेच्या बरणीत भरून ठेवावे.

आठदहा दिवसांपेक्षा जास्त टिकत नाही.

MarathiMati.com - Android App on Google Play Store