उकडीचे मोदक

द्वारे | प्रकाशक संपादक मंडळ | ४ फेब्रुवारी २०१५

उकडीचे मोदक प्रकार | Ukadiche Modak

उकडीचे मोदक - [Ukadiche Modak] अस्सल कोकणी घरगुती पद्धतीचे उकडीचे मोदक.

जिन्नस


  • २ भांडी बासमती तांदूळ पीठ
  • २ भांडी पाणी
  • चिमूटभर मीठ
  • १ चमचा लोणी किंवा साजूक तूप
  • अर्धा चमचा साखर

सारणाचे जिन्नस


  • १ नारळ
  • पाव किलो गूळ
  • ५० ग्रॅम खवा (आवडीनुसार)

पाककृती


पुरणासाठी असणारा नारळ थोडा भाजून घ्यावा (पाणी सुटू नये म्हणून) त्यात गूळ, खवा व १ चमचा तांदूळ पीठी घालावी. याप्रमाणे पुरण आधीच तयार करून ठेवावे. २ भांडी पाणी उकळत ठेवावे.पातेल्यातील पाण्याला अर्थवट उकळी आल्यावर त्यात लोणी, साखर घालावी. नंतर पाणी ढवळून त्यात पीठ घालावे व उलथन्याच्या टोकाने एकाच बाजूने ढवळावे. झाकण ठेवून वाफ आणावी. पंचा ओला करून तयार झालेली उकड गरम असतानाच मळून घ्यावी. तयार झालेल्या उकडीची पारी करुन त्यात पुरण भरावे व मोदकाचा आकार द्यावा. असे मोदक तयार करून १५-२० मिनिटे वाफवावेत.

हळदीच्या पानात वाफवल्यास स्वाद चांगला येतो.

उकडीचे मोदक - संबंधित उपयुक्त लेखन/दुवे


या विभागातील नवीन लेखन

लैंगिक शिक्षण सुखाचा मूलमंत्र | Laingik Shikshan Sukhacha Mulmantra

स्वीट कॉर्न सूप | Sweet Corn Soup

स्वीट कॉर्न सूप

विभाग पाककला

मटण हंडी | Mutton Handi

मटण हंडी

विभाग पाककला