उकडीचे मोदक
Ukadiche Modak
साहित्य :
- २ भांडी बासमती तांदूळ पीठ
- २ भांडी पाणी
- चिमूटभर मीठ
- १ चमचा लोणी किंवा साजूक तूप
- अर्धा चमचा साखर
- १ नारळ
- पाव किलो गूळ
- ५० ग्रॅम खवा (आवडीनुसार)
पुरणासाठी असणारा नारळ थोडा भाजून घ्यावा (पाणी सुटू नये म्हणून) त्यात गूळ, खवा व १ चमचा तांदूळ पीठी घालावी. याप्रमाणे पुरण आधीच तयार करून ठेवावे. २ भांडी पाणी उकळत ठेवावे.पातेल्यातील पाण्याला अर्थवट उकळी आल्यावर त्यात लोणी, साखर घालावी. नंतर पाणी ढवळून त्यात पीठ घालावे व उलथन्याच्या टोकाने एकाच बाजूने ढवळावे. झाकण ठेवून वाफ आणावी. पंचा ओला करून तयार झालेली उकड गरम असतानाच मळून घ्यावी. तयार झालेल्या उकडीची पारी करुन त्यात पुरण भरावे व मोदकाचा आकार द्यावा. असे मोदक तयार करून १५-२० मिनिटे वाफवावेत.
हळदीच्या पानात वाफवल्यास स्वाद चांगला येतो.






