टोमॅटोचे तिखट तोक्कू लोणचे

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १४ जानेवारी २००८

टोमॅटोचे तिखट तोक्कू लोणचे

टोमॅटोचे तिखट तोक्कू लोणचे - [Tomatoche Tikhat Thokku Lonache] टोमॅटो, उडदाची डाळ आणि तिखट घालून केलेले टोमॅटोचे तिखट तोक्कू लोणचे हे तामिळनाडूचे प्रसिद्ध लोणचे आहे.

जिन्नस


  • १ किलो लालबुंद टोमॅटो
  • २ मोठे चमचे तेल
  • १ चमचा मोहरी
  • ३ चमचे उडदाची डाळ
  • २ चमचे तिखट
  • ३ चमचे मीठ
  • २ चमचे गूळ
  • अर्धा चमचा हिंग

पाककृती


टोमॅटो धुवून पुसून ठेवावे. त्याचे चार किंवा आठ तुकडे करावेत.

कल्हईच्या पातेल्यात तेल तापवावे. त्यात मोहरी व डाळ घालावी.

डाळ तांबूस झाली की हिंग व टोमॅटो घालावे.

जरा ढवळून आंच मंद करावी व पाण्याचे झांकण ठेवावे.

१०-१२ मिनिटात पाणी सुटून टोमॅटो शिजत येतील. नंतर त्यात तिखट, मीठ व गूळ घालावा.

ढवळून पाच मिनिटे उकळलेल की खाली उतरवावे. झांकण ठेवू नये.

गार झाल्यानंतर लहान बरणीत भरावे.