टोमॅटोचे गोड लोणचे

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १० जानेवारी २००८

टोमॅटोचे गोड लोणचे

टोमॅटोचे गोड लोणचे - [Tomatoche God Lonache] टोमॅटो, दाण्याचे कुट आणि गूळ घालून तयार केलेले टोमॅटोचे गोड लोणचे सॉस ऎवजी ब्रेड किंवा रोटी, पराठ्यासोबत खाऊ शकता.

जिन्नस


  • ४-५ टोमॅटो
  • २ चमचे तेल
  • पाव चमचा मोहरी
  • पाव चमचा जिरे
  • २ चिमट्या हिंग
  • पाव चमचा हळद
  • अर्धा चमचा तिखट
  • ३ चमचे दाण्याचे कुट
  • १ चमचा मीठ
  • थोडासा गूळ

पाककृती


टोमॅटोच्या चार किंवा आठ फोडी चिराव्या, कल्हईच्या मध्यम पातेल्यात तेल तापले की मोहरी, जिरे व हिंग व हळद घालून त्यावर टोमॅटो घालावे.

जरा अवसडून किंवा अलगद ढवळून मंद आंचेवर शिजू द्यावेत. वर पाण्याचे झाकण ठेवावे.

८-१० मिनिटांनंतर दाण्याचे कूट, तिखट, मीठ व गूळ घालून पुन्हा ढवळावे दोन उकळ्या आल्या की खाली उतरावे.

३-४ दिवस फ्रीजमध्ये टिकते. सॉस‍ऐवजी देखील वापरता येते.

सूचना

टोमॅटोची साल पुष्कळ मुलांना व मोठ्या मंडळींनाही आवडत नाही.

तसे असल्यास प्रथम टोमॅटो मिनिटभर उकडीच्या पाण्यात ठेवून नंतर थंड पाण्यात ठेवावे.

पाच मिनिटांनंतर बाहेर काढावे. साल सुटून येते.

ती काढून टाकावी व आतल्या गराचे तुकडे करून फोडणीस टाकावे व शिजवावे म्हणजे खाताना सालपटे येणार नाहीत.