पाककला | Maharashtrian Recipes

टोमॅटोचे गोड लोणचे | Pickle Recipes

साहित्य :

४-५ टोमॅटो, २ चमचे तेल, पाव चमचा मोहरी, पाव चमचा जिरे, २ चिमट्या हिंग, पाव चमचा हळद, अर्धा चमचा तिखट, ३ चमचे दाण्याचे कुट, १ चमचा मीठ

 

कृती :

टोमॅटोच्या चार किंवा आठ फोडी चिराव्या, कल्हईच्या मध्यम पातेल्यात तेल तापले की मोहरी, जिरे व हिंग व हळद घालून त्यावर टोमॅटो घालावे. जरा अवसडून किंवा अलगद ढवळून मंद आंचेवर शिजू द्यावेत. वर पाण्याचे झाकण ठेवावे, ८-१० मिनिटांनंतर दाण्याचे कूट, तिखट, मीठ व गूळ घालून पुन्हा ढवळावे दोन उकळ्या आल्या की खाली उतरावे. ३-४ दिवस फ्रीजमध्ये टिकते. सॉस‍ऐवजी देखील वापरता येते.

 

सूचना :

टोमॅटोची साल पुष्कळ मुलांना व मोठ्या मंडळींनाही आवडत नाही. तसे असल्यास प्रथम टोमॅटो मिनिटभर उकडीच्या पाण्यात ठेवून नंतर थंड पाण्यात ठेवावे. पाच मिनिटांनंतर बाहेर काढावे. साल सुटून येते. ती काढून टाकावी व आतल्या गराचे तुकडे करून फोडणीस टाकावे व शिजवावे म्हणजे खाताना सालपटे येणार नाहीत.

Visit MarathiMati.net

नवीन लेखन - मराठीमाती.नेट new

मराठी कविता

नुसताच प्रवास गांडुगिरीचा

लाटाच लाटा
आणि समुद्र टिंगल करतोय
येडझव्या प्रवाशांची
तू ही रे! तू ही रे! गाण्यावर
मुले हिंदकळताहेत
लॉंचच्या तोंडाशी
वर खाली उभे आडवी
एक लाट येते
मी ओक ओक ओकतोय
रात्रीच्य भर समुद्रात
आदल्या रात्रीचं अजीर्ण संमेलन.

Marathi Matrimony