टोमॅटो सूप

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ११ जानेवारी २००८

टोमॅटो सूप

टोमॅटो सूप - [Tomato Soup] भूक वाढवणारे आणि थंडीत उपयुक्त असे पौष्टिक ‘टोमॅटो सूप’ स्टार्टरवेळी घ्यावे.

जिन्नस


  • १ किलो टोमॅटो
  • १/२ वाटी साखर
  • १ चमचा मीठ
  • १/२ चमचा काळी मिरी
  • ब्रेडचे छोटे तुकडे

पाककृती


सर्वात पहिले टोमॅटो पाण्यात उकळण्यासाठी ठेवावे. जेव्हा टोमॅटो गळतील आणि पाणी सुकेल तेव्हा सुईच्या साहाय्याने त्यास छेदावे.

छेदल्यानंतर गाळुन घ्यावे. त्यात मीठ, काळी मिरी आणि साखर मिळवावी कमी गॅसवर शिजवण्यासाठी ठेवून द्यावे.

सुपास रंग येण्यासाठी थोडेसे बीट टाकावे, जर सुप घट्ट झाले तर थोडेसे पाणी मिसळावे.

१०-१५ मिनीट शिजल्यानंतर गॅस बंद करावा. गरम गरम वाढावे. खाते वेळी वरून तळलेल्या ब्रेडचे छोटे छोटे तुकडे टाकावे.