टोमॅटोचा मसाला डोसा

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २४ जानेवारी २००८

टोमॅटोचा मसाला डोसा | Tomato Masala Dosa

टोमॅटोचा मसाला डोसा - [Tomato Masala Dosa] मैदा, अंडे, टोमॅटो आणि चीझ एकत्र करुन टोमॅटोचा मसाला डोसा न्याहारी किंवा मधल्या वेळेत झटपट करता येईल.

जिन्नस


  • १२५ ग्रॅम मैदा
  • १ अंडे
  • १ मोठा टोमॅटो
  • २-३ हिरव्या मिरच्या
  • १ १/२ कप दूध
  • १/४ चमचा मीठ
  • थोडेसे किसलेले चीझ

पाककृती


मैदा व मीठ एकत्र करुन त्यात अंडी फोडून घालावीत व दूध घालून पीठ भिजवून ठेवावे.

जरुर वाटल्यास थोडेसे पाणी घालावे. अर्धा तास पीठ भिजवून ठेवावे.

टोमॅटो बारीक चिरावेत. चीझ किसून घ्यावे.

नंतर टोमॅटो, मीठ, बारीक चिरलेल्या मिरच्या व चीझ एकत्र करुन ठेवावे.

सपाट तव्याला तेल किंवा तूप लावून त्यावर कपाने पीठ ओतून डोसा घालावा. झाकण ठेवू नये.

डोसा शिजला की बाजूने तेल सोडून जरा कुरकुरीत करावा.

मध्यभागी टोमॅटोचे थोडेसे मिश्रण भरुन डोशाप्रमाणे घडी घालावी व गरमगरम सर्व्ह करावा.

चवीला फार छान लागतो.