तीळाची बर्फी

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २ जानेवारी २००८

तीळाची बर्फी | Tilachi Barfi

तीळाची बर्फी - [Tilachi Barfi] तीळ उष्ण आणि स्निग्ध पदार्थ असल्याने हा पदार्थ थंडीत खाल्ल्यास आरोग्यास उत्तम असतो, मकरसंक्रांत या सणाला तीळाचे विशेष महत्व आसल्याने तीळ गुळ म्हणून तीळाची बर्फी करू शकतो.

जिन्नस


  • २०० ग्रॅम तीळ
  • २०० ग्रॅम काजूचे तुकडे
  • ४०० ग्रॅम साखर
  • १ १/२ वाटी सायीसकट दूध
  • १/२ चमचा रोझ इसेन्स
  • वर्खचा कागद

पाककृती


तीळ जरा कमीच भाजावेत व त्यांची नंतर यंत्रावर पूड करून घ्यावी. काजूचीही पूढ करावी.

जाड बुडाच्या पतेल्यात, साखरेत सायीसकट दूध घालून पाक करावा.

गोळीबंद पाक झाल्यावर, त्यात इसेन्स, काजूची व तिळाची पूड घालून ढवळावे व लगेच तूप लावलेल्या ट्रेमध्ये ओतावे व सारखे थापावे.

गरम गरम आहे, तोवरच त्यावर वर्खाचा कागद थापावा आणि वड्या पाड्याव्यात.