तीळाचे लाडू

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १ जानेवारी २००८
तीळाचे लाडू
तीळाचे लाडू

तीळाचे लाडू - [Tilache Ladu] ‘तीळाचे लाडू’ थंडीच्या दिवसात खायला पोष्टिक असतात.

जिन्नस


  • २५० ग्रॅम तीळ
  • ५०० ग्रॅम खवा
  • ५०० ग्रॅम पीठी साखर
  • अर्धा चमचा वेलची पावडर

पाककृती


  • तीळ साफ करून कढईत भाजा. हलका गुलाबी रंग झाल्यावर गॅस बंद करा.
  • हलक्या हाताने कुटून घ्या. कढईत खवा भाजून घ्या.
  • थंड झाल्यावर त्यात पीठी साखर, तीळ व वेलची पावडर मिसळून लाडू वळून घ्या.