थंडाई

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १२ जानेवारी २००८

थंडाई

थंडाई - [Thandai] ‘थंडाई’ हे एक असं थंडपेय आहे जे बदाम, वेलची, केशर, डांगराच्या बीया, गुलाबाच्या पाकळ्या वगैरे टाकून बनविले जाते. हे पेय खासकरुन माहाशिवरात्री आणि होळीला पितात.

जिन्नस


  • १५० ग्रॅम बदाम
  • २० ग्रॅम छोटी वेलची
  • १ लहान चमचा केशर
  • १/२ कप डांगराच्या सोललेल्या बिया
  • १० ते १२ काळी मिरी
  • १ कप गुलाबची पाने
  • १/२ कप खसखस
  • १ किलो साखर
  • १/२ लि. पाणी
  • १ चमचा पोटेशियम मेटा बाय सल्फेट

पाककृती


बदाम पाण्यात ५ ते ६ तास भिजवून सोलून घ्यावेत.

आता सर्व साहित्य मिक्सरमध्ये घालून कोरडे वाटून घ्यावे.

१/२ लि. पाण्यात ते मिश्रण ८ ते १० तास भिजवून ठेवावे. नंतर याला बारीक वाटून गाळून घ्यावे. यात साखर घालून गरम करावे.

पाक घट्ट झाल्यावर चुलीवर उतरून थंड करावे व नंतर पोटेशियम मेटा बाय सल्फेट मिसळून बाटलीत भरून घ्यावे

सर्व्ह करताना यात दूध टाकून वर बर्फाचा चुरा टाकावा.