Download MarathiMati.com's New Android App from Google Play

टेस्टी कढी पकोडा

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १४ जानेवारी २००८

टेस्टी कढी पकोडा

टेस्टी कढी पकोडा - [Tasty Kadhi Pakora] भूक वाढवणारे आणि थंडीत उपयुक्त असे पौष्टिक ‘टेस्टी कढी पकोडा’ स्टार्टरवेळी घ्यावे.

पकोड्यासाठी साहित्य


  • २ कप बेसन
  • १/२ कप बारीक चिरलेला कांदा
  • ६ बारीक चिरलेल्या हि. मिरच्या
  • १ लहान चमचा लाल तिखट
  • मीठ चवीनुसार
  • २ मोठे चमचे तेल
  • पकोडे तळण्यासाठी आणखी वेगळं तेल

कढीसाठी साहित्य


  • ५ कप आंबट दही
  • ६ मोठे चमचे बेसन
  • १ लहान चमचा मोहरी
  • १/२ लहान चमचा हळदपूड
  • ६ उभ्या चिरलेल्या हि. मिरच्या
  • १ इंच बारिक चिरलेला आल्याचा तुकडा
  • चिमूटभर हिंग
  • ४ कप गरम पाणी
  • मीठ चवीनुसार

सजावटीसाठी साहित्य


  • १ लहान चमचा तेल
  • २ अख्ख्या लाल मिरच्या

पाककृती


कढी बनवण्यासाठी दह्यामध्ये बेसन व पाणी घालून हॅण्ड मिक्सरने एकजीव करुन घ्या.

एका मोठ्या पातेल्यात तेल गरम करुन त्यामध्ये मोहरी, हिंगाची फोडणी घाला. मग त्यामध्ये आलं, हि. मिरच्या व हळद घाला.

त्यानंतर दही-बेसनाचं मिश्रण व मीठ घाला. मोठ्या आचेवर मिश्राण उकळा. मग आच कमी करा. जवळपास १५ मिनिटं मंद आचेवर मिश्रण घट्ट होईपर्यंत शिजवा.

आता पकोड्यांसाठी बेसनमध्ये पाणी घालून घट्ट भजीसारखं पीठ तयार करा व ते व्यवस्थित फेटा.

यामध्ये चिरलेला कांदा, हि. मिरच्या, लाल तिखट, मीठ व गरम तेल घाला. पुन्हा एकवार फेटा. मग गरम तेलात याचे पकोडे तयार करा.

शिजलेल्या कढीमध्ये पकोडे टाका व ५ मिनिटं आणखी मंद आचेवर शिजू द्या. यानंतर सर्व्हींग बाऊलमध्ये कढी ओता.

एक चमचा तेल गरम करुन त्यामध्ये लाल मिरची परता व ही फोडणी कढीवर ओता.

ही कढी दिसायलाही छान दिसते.

Download MarathiMati.com's New Android App from Google Play