MarathiMati.com - Android App on Google Play Store

तांदुळाची खीर

द्वारे | प्रकाशक संपादक मंडळ | १५ जानेवारी २००८

तांदुळाची खीर

तांदुळाची खीर - [Tandalachi Kheer] मराठमोळी महाराष्ट्रीयन तांदुळाची खीर सण-उत्सवाच्या वेळी गोड पदार्थ म्हणून पुडींगसारखी खाऊ शकता.

जिन्नस


  • ७ चमचे तांदूळ
  • १ लिटर दूध
  • १० चमचे साखर
  • २ वेलदोडे (पूड)
  • सुकामेवा काजू
  • बदाम
  • चारोळ्या यापैकी असेल ते (नसले तरी चालेल)

पाककृती


तांदूळ धुवून १५-२० मिनिटे बाजूला ठेवावेत.

दूध तापवून त्याला उकळी आली की त्यात तांदूळ घालावे व सतत ढवळत राहावे.

सुमारे तीस मिनिटे मंद गॅसवर शिजवावे.

तांदळाचा दाणा हाताने दाबून पाहावा. मऊ झालेला असला व चटकन दाबला गेला की साखर घालावी व पाच मिनिटे आणखी चुलीवर ठेवून ढवळत राहावे.

फार दाट वाटल्यास कपभर दूध घालावे.

खाली उतरवून खीर गार झाली की त्यात वेलचीपूड व काजू, बेदाणे घालावे.

ही खीर जेवणानंतर पुडिंगसारखी बाऊलमध्ये घालून खायला द्यावी.

MarathiMati.com - Android App on Google Play Store