MarathiMati.com - Android App on Google Play Store

लिंबाचे गोड लोणचे

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ५ जानेवारी २००८

लिंबाचे गोड लोणचे

लिंबाचे गोड लोणचे - [Sweet Lime Pickle] आंबट गुणधर्म असलेल्या लिंबाचे गोड लोणचे घरच्या घरी बनवून खाऊ शकता.

जिन्नस


 • ५ किलो लिंबु
 • २०० ग्रॅ. काळी मिरची
 • १०० ग्रॅ. मोठी वेलची
 • ५० ग्रॅ. जीरे
 • १० ग्रॅ. प्रत्येक दालचिनी
 • तेजपान
 • ५० ग्रॅ. लवंग
 • ५ नग जायफळ
 • १०० ग्रॅ. सिरका
 • ३ कि. साखर
 • ५०० ग्रॅ. आले
 • ४०० ग्रॅ. सेंधा मीठ
 • १०० ग्रॅ. काळे मीठ

पाककृती


मोठ्या आकारात लिंबू घ्यावे. धुवून पुसून उन्हात सुकवावे नंतर चार चार खापा या प्रकारे कापाव्या की त्या एका बाजुने जोडलेल्या राहतील.

आल्यास सोलुन बारीक करावे. सर्व मसाल्यांना अर्धवट कुटुन घ्यावे. नंतर त्यात साखर व विनेगर मिळवून लिंबामध्ये भरून लिंबाना बरणीत ठेवावे व बरणीस चांगल्या तर्‍हेने बंद करून उन्हात ठेवावे.

१०-१५ दिवसात लोणचे तयार होऊन जाईल.

MarathiMati.com - Android App on Google Play Store