गोड लस्सी

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ६ जानेवारी २००८

गोड लस्सी

गोड लस्सी - [Sweet Lassi] दही आणि गुलाब पाणी असलेली गोड लस्सी उन्हाळ्यासाठी अत्यंत उपयुक्त असे थंडपेय आहे.

जिन्नस


  • ४ वाट्या गोड दही
  • १०० ग्रॅम साखर
  • गुलाब पाणी
  • मलई

पाककृती


दह्यात थोडे पाणी घालून जाडसर घुसळून घ्यावे.

साखर व दोन टी-स्पून गुलाब पाणी घालून पुन्हा एकदा ते घुसळून घ्यावे व चार ग्लास मध्ये सर्व्ह करावे.

सर्व्ह करताना वरून मलई घालण्यास विसरू नये.