MarathiMati.com - Android App on Google Play Store

स्वीट कॉर्न उपमा आणि सॅंडविच

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ७ जानेवारी २००८

स्वीट कॉर्न उपमा आणि सॅंडविच

स्वीट कॉर्न उपमा आणि सॅंडविच - [Sweet Corn Upama And Sandwich] पोटभर न्याहारी तसेच मधल्या वेळेत खाण्यासाठी ‘स्वीट कॉर्न उपमा आणि सॅंडविच’ घरी बनवता येईल.

जिन्नस


  • २२५ ग्रॅम मक्याचे दाणे (स्वीट कॉर्न)
  • हिरव्या मिरच्या
  • १ टी स्पू. लिंबाचा रस
  • १/२ वाटी खवलेले नारळ
  • बारीक चिरलेली कोथिंबीर
  • चवीपुरती साखर
  • हळद
  • मीठ
  • फोडणीसाठी तेल
  • कडीपत्त्याची पाने
  • मोहरी
  • जीरे
  • हिंग
  • बटर किंवा तूप
  • ब्रेड

पाककृती


मक्याचे दाणे (स्वीट कॉर्न), हिरव्या मिरच्या, मीठ, साखर, लिंबाचा रस घालून भरडुन घ्या.

गॅसवर भांडे ठेवून त्यात थोडं तेल टाकून त्यात जीरे-मोहरी, चिरलेल्या हि. मिरच्या, कढीपत्त्याची पाने, हिंग टाका. नंतर त्यात भरडलेलं मिश्रण टाकून चांगले हलवून घ्या.

भांड्यावर झाकण ठेवून ३-४ मिनीटे ठेवा. डिशमध्ये काढून कोथिंबीर व खवलेले नारळ पेरा.

मक्याचा चवदार उपमा तयार..!

हा तयार उपमा २ ब्रेड स्लाईसेसच्या मध्ये भरुन बटर किंवा तूप लावून टोस्टरमध्ये भाजुन घ्या व गरमागरम सॉस किंवा चटणीसोबत खायला द्या.

हे तयार आहे तुमचे स्वीट कॉर्न सॅंडविच.

MarathiMati.com - Android App on Google Play Store