MarathiMati.com - Android App on Google Play Store

स्वीट कॉर्न सूप

द्वारे | प्रकाशक संपादक मंडळ | ४ जानेवारी २००८

स्वीट कॉर्न सूप

स्वीट कॉर्न सूप - [Sweet Corn Soup] पौष्टिक आणि जेवणाअगोदर खाल्यामूळे भूक वाढवणारे असे ‘स्वीट कॉर्न सूप’ घरी बनवता येईल.

जिन्नस


  • १ टिन स्वीट कॉर्न
  • २ मोठे चमचे कॉर्नफ्लावर
  • २ मोठे चमचे लोणी
  • १/२ छोटा चमचा अजीनोमोटो पावडर
  • १/२ कप पत्ता कोबी
  • १ गाजर
  • १ कांदा
  • २ चीज क्यूब

पाककृती


कोबी, गाजर व कांदा बारीक चिरुन घ्या. १/२ कप पाण्यात कॉर्नफ्लावर टाका.

एका भांड्यात टिनमधील स्वीट कॉर्न, कॉर्नफ्लावर व ६ कप पाणी टाकून गॅसवर ठेवा.

उकळी आल्यावर लोणी, अजीनोमोटो पावडर टाकून १० मिनीटे शिजवा.

कांदा, गाजर, व कोबी टाकून ५ मिनीटे शिजवा गॅस बंद करून किसलेले चीज टाका. गरम-गरम वाढा.

MarathiMati.com - Android App on Google Play Store