MarathiMati.com - Android App on Google Play Store

सुकी उडीद डाळ

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २१ जानेवारी २००८

सुकी उडीद डाळ | Suki Udid Dal

सुकी उडीद डाळ - [Suki Udid Dal] उडीद डाळीत टोमॅटो, मसाला वगैरे घालून चटपटीत, पोष्टिक असलेली ही सुकी उडीद डाळ न्याहारी किंवा मधल्या वेळेत चपाती, पराठ्यासोबत खायला देऊ शकता.

जिन्नस


  • १ कप धुतलेली उडीद डाळ
  • १ कापलेला कांदा
  • १ मोठा चमचा तेल
  • ३/४ चमचे मीठ
  • १/२ चमचे हळद
  • २ मोठी वेलची
  • १ चमचे जीरे
  • १ जुडी कापलेली कोथिंबीर
  • २ हिरवी मिरची
  • १ कापलेला टोमॅटो
  • १/२ चमचे गरम मसाला

पाककृती


डाळीस धुवुन ४ कप पाण्यात हळद व मीठाबरोबर शिजवून द्यावे आणि गाळून पाणी वेगळे करावे.

तेल गरम करून जीरे टाकावे नंतर वेलची टाकून १ मिनीट फ्राय करावे.

कांदा टाकुन लालसर फ्राय करावा नंतर डाळ, हिरवी मिरची, टोमॅटो, कोथिंबीर व गरम मसाला टाकुन ३-४ मिनीट गॅस कमी करून शिजवावे आणि उतरवून घ्यावे.

ही सुकी उडीद डाळ रोटी, पराठ्यासोबत खाऊ शकता.

MarathiMati.com - Android App on Google Play Store