स्ट्रॉबेरी सरबत

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ७ जानेवारी २००८

स्ट्रॉबेरी सरबत

थकवा घालविण्यासाठी, त्वचेच्या सौंदर्यासाठी आणि शक्तिवर्धक असे स्ट्रॉबेरी सरबत (Strawberry Sarbat) अत्यंत उपयुक्त आहे.

जिन्नस


  • १ किलो साखर
  • ४०० मिली.पाणी
  • अर्धा चमचा सायट्रिक अ‍ॅसिड
  • पाव चमचा स्ट्रॉबेरी रेड कलर
  • अर्धा चमचा स्ट्रॉबेरी इसेंस

पाककृती


प्रथम १ किलो साखरेत ४०० मिली. पाणी घालावे. त्यात अर्धा चमचा सायट्रिक अ‍ॅसिड घालावे.

एकत्र करून गॅसवर १ उकळी येईपर्यंत ठेवावे.

थंड झाल्यानंतर रंग, इसेंस घालणे व गाळून बाटलीत भरावे.

सरबत देताना पाव भाग तयार केलेले लिक्विड आणि पाऊण भाग पाणी किंवा दूध व एखादा बर्फाचा खडा टाकावा.