स्ट्रॉबेरी सरबत
Strawberry Sarbat

स्ट्रॉबेरी सरबत
- १ किलो साखर
- ४०० मिली.पाणी
- अर्धा चमचा सायट्रिक अॅसिड
- पाव चमचा रासबेरी रेड कलर
- अर्धा चमचा स्ट्रॉबेरी इसेंस
कृती :
प्रथम १ किलो साखरेत ४०० मिली. पाणी घालावे. त्यात अर्धा चमचा सायट्रिक अॅसिड घालावे. एकत्र करून ढवळावे व गॅसवर १ उकळी येईपर्यंत ढवळत राहावे. एक उकळी आल्यावर गॅस बंद करून व ते लिक्विड गार झाल्यावर त्यात इसेंस व कलर घालावा. सरबत देण्याचे वेळी पाव भाग तयार केलेले लिक्विड त्यात पाऊण भाग पाणी किंवा दूध घालावे.







