स्ट्रॉबेरी जॅम

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १७ जानेवारी २००८

स्ट्रॉबेरी जॅम

स्ट्रॉबेरी जॅम - [Strawberry Jam] ताज्या स्ट्रॉबेरीपासून बनविलेला सर्वांना आवडणारा स्ट्रॉबेरी जाम पोळीला किंवा ब्रेडला लावून न्याहारीला अथवा मुलांना डब्यात देता येतो.

जिन्नस


  • २५० ग्रॅम स्ट्रॉबेरी
  • ४०० ग्रॅम पिठीसाखर

पाककृती


स्ट्रॉबेरी स्वच्छ पाण्यात घालून हलक्या हाताने बाहेर काढाव्यात. वरचे हिरवे देठ काढून टाकावे.

नंतर त्यात पिठीसाखर घालून हाताने कुसकरावे.

साखरेला जरा पाणी सुटले, की गॅसवर ठेवावे.

मंदाग्नीवर असू द्यावे. झाकण ठेवावे.

नंतर हलक्या हाताने ढवळत राहावे. जाडसर पाक झाला की उतरावा.

हा जॅम जास्त दिवस टिकत नाही.