मसाले
मसाले - (Spices)विविध मसाले बनविण्याच्या कृती(मसाले), Various types of Spices.
मसाले - (Spices)विविध मसाले बनविण्याच्या कृती(मसाले), Various types of Spices.
मुळचा कोकणातल्या मालवणचा असलेला हा ‘मालवणी मसाला’ रंगाने अत्यंत लालसर आणि चवीला तितकाच तिखट असतो. ‘मालवणी मसाला’ हा मुख्यतः झणझणीत आणि तिखट पदार्थ बनविण्यासाठी वापरला जातो.
तीळ, खोबरे, खसखस सारखे पदार्थ वापरून बनविलेला ‘गोडा मसाला’ चवीला काहीसा गोडसरच असतो. मटकीची उसळ, कटाची आमटी, मिसळ पाव, आमटी डाळ, भरली भेंडी, तोंडलीची भाजी सारख्या व्यंजनामध्ये ‘गोडा मसाला’ आवर्जून वापरला जातो.
अस्सल महाराष्ट्रीयन असलेला असा हा ‘कांदा लसूण मसाला’ मुख्यतः उसळ, वरण आणि मसाले भात सारख्या व्यंजनांत आवर्जुन वापरला जातो.
हे अतिशय औत्सुक्याचे आहे की दररोजचे शाकाहारी किंवा मांसाहारी पदार्थ बनविण्यासाठी ‘पंजाबी मसाला’ घरोघरी सर्वाधिक प्रमाणात वापरला जातो. सोबतच दक्षिण भारतीय आणि उत्तर भारतीय व्यंजनांमध्ये देखील या मसाल्याचा उपयोग प्रकर्षाने केला जात असल्याचे दिसते. उदाहरणार्थ, पंजाबी छोले, पनीर टिक्का, पनीर बटर मसाला, बटर चिकन, चिकन टिक्का ईत्यादी.
महाराष्ट्रातील सर्वाधिक निसर्ग संपन्न अशा कोकणातील ‘कोकणी मसाला’ हा विश्वविख्यात आहेच शिवाय काही प्रमुख भारतीय मसाल्यांतील हा एक लोकप्रिय चविचा मसाला म्हणूनही ओळखला जातो. ‘कोकणी मसाला’ हा शाकाहारी आणि मांसाहारी अशा दोनही प्रकारच्या व्यंजनांसाठी वापरला जातो.