स्पेशल गरम मसाला

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २० जानेवारी २०१८

स्पेशल गरम मसाला प्रकार | Special Garam Masala

स्पेशल गरम मसाल्याची पाककृती - [Special Garam Masala Recipe] महाराष्ट्रातील प्रत्येक स्वयंपाक घरात अगदी सहज सापडणारा असा हा ‘स्पेशल गरम मसाला’.

जिन्नस


  • १/४ किलो काळे जीरे
  • १०० ग्रॅम खसखस
  • ५० ग्रॅम दालचिनी
  • ५० ग्रॅम लवंग
  • १०० ग्रॅम बडीशेप
  • ४ - ५ मसाला वेलदोडे
  • ४ - ५ हिरवे वेलदोडे
  • २ ग्रॅम दगड फूल
  • १/२ जायफळ
  • २ - ३ बाद्यान (बदामफुले)

पाककृती


  • प्रथम वरील सर्व साहित्य निवडून घ्या.
  • सर्व साहित्य कोरडेच वेगवेगळे भाजून घ्या.
  • भाजून झाल्यावर बाजूला थंड करायला ठेवा.
  • थंड झाल्यानंतर मिक्सरवर बारीक पूड करुन घ्या.
  • तयार स्पेशल गरम मसाला घट्ट झाकणाच्या बरणीत भरून ठेवा.