NashikDiary.com

सिंधी बेसन करी

Sindhi Besan Curry

साहित्य :

 • ५ टेबलस्पून बेसन (शिग लावून)
 • १ लिंबाएवढी चिंच
 • ३-४ आमसुले
 • ७-८ भेंड्या
 • १०-१२ गवारीच्या शेंगा
 • १०० ग्रॅम दुधी
 • १-२ छोटी गाजरे
 • २ मोठे बटाटे
मसाला :
 • १/२ चमचा मेथी
 • १/२ चमचा जिरे
 • १/२ चमचा मोहरी
 • थोडा हिंग
 • ३-४ हिरव्या मिरच्या
 • ३-४ लाल मिरच्या
 • थोडा कढीलिंब
 • १ मूठ चिरलेली कोथिंबीर
 • थोडे तिखट
 • मीठ
 • ३-४ टेबलस्पून तेल
कृती :थोड्या पाण्यात चिंच भिजत घालावी. १ लिटर पाणी उकळायला ठेवावे. त्यात चिंचेचा कोळ घालावा.भाज्यांचे तुकडे ह्या पाण्यात शिजवून घ्यावेत.२ टेबलस्पून डाळीचे पीठ १ ग्लास पाण्यात घालून सारखे करावे.एका पातेल्यात तेल तापत ठेवावे. नंतर त्यात मोहरी, जिरे व मेथी घालून फोडणी करावी.त्यावर उरलेले डाळीचे पीठ घालून लालसर होईपर्यंत परतावे. नंतर त्यात वरील भाज्यांचे गरम पाणी, हळद, वाटलेल्या मिरच्या, कढीलिंब, तिखट, मीठ, कोथिंबीर घालावी.उकळी आली की गार पाण्यात कालवलेले पीठ ओतावे.आमसुले व भाज्यांचे तुकडे घालावे.करी गरमच वाढावी.