Download MarathiMati.com's New Android App from Google Play

सरसोची भाजी - सरसों का साग

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १३ जानेवारी २००८

सरसोची भाजी - सरसों का साग

सरसोची भाजी - सरसों का साग - [Sarsochi Bhaji] ‘सरसोची भाजी - सरसों का साग’ ही पंजाबी पाककृती असून खासकरुन थंडीच्या दिवसात आणि ते सुद्धा मक्याच्या रोटीसोबत खायला अजून स्वाद येईल.

जिन्नस


 • ५०० ग्रॅ. सरसो
 • १५० ग्रॅ. पालक
 • ५० ग्रॅ. पीठ
 • २ लाल मिरच्या
 • १ तुकडा कापलेले आले
 • २ कापलेल्या हिरव्या मिरच्या
 • १ कपलेला कांदा
 • १/२ चमचा गरम मसाला
 • ४ पाकळी लसूण
 • १ चमचा लिंबाचा रस
 • १/२ कप ताजे क्रीम
 • ३ मोठे चमचे तूप
 • चवीनुसार मीठ

पाककृती


सरसो व पालक धुवून बारीक कापावे. २ कप पाण्याबरोबर कूकरमध्ये तीन शिट्ट्या होईपर्यंत शिजवावे.

गव्हाच्या पीठास थोड्या पाण्यात मिळवून मीठ, तिखट, गरम मसाला, आले आणि क्रीम मिळवावे.

एक चमचा तुपात पीठाच्या मिश्रणास सोनेरी भाजून उतरवून घ्यावे.

एका दुसर्‍या कढईत उरलेले तूप गरम करून जीरे, कांदा, लसूण, हिरव्या मिरच्या, लाल मिरच्या तोडुन टाकावी व फ्राय झाल्यावर पीठाच्या मिश्रणास मिळवावे.

२ मिनीटानंतर सरसो व पालक टाकुन चांगल्या तर्‍हेने घोटावे.

पाच-सात मिनीट शिजवून उतरवून घ्यावे वरून लोणी टाकावे आणि मक्याच्या चपातीबरोबर वाढावे.

Download MarathiMati.com's New Android App from Google Play