Download MarathiMati.com's New Android App from Google Play

सफरचंदाची चटणी

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ५ जानेवारी २००८

सफरचंदाची चटणी

सफरचंदाची चटणी - [Sapharchandachi Chutney] TEXT

जिन्नस


 • १ किलो मोठी दळदार आंबट सफरचंद
 • ३०० ग्रॅम गूळ
 • २ मोठे चमचे बेदाणे (थोडे कमी चालतील)
 • २ मोठे चमचे मीठ
 • ३२५ मिली व्हिनेगर
 • ४-५ लाल सुक्या मिरच्या
 • अर्धा चमचा मोहरी
 • २ मोठे चमचे लिंबाचा रस
 • अर्धा चमचा किसलेली लिंबाची साल
 • १ कांदा
 • ६ लसूण पाकळ्या
 • ४ तमालपत्रे
 • २ चमचे सुंठाची पूड
 • अर्धा चमचा लाल तिखट

पाककृती


सफरचंदाची साल, बिया व गाभा काढून गर किसावा. लाल मिरच्या थोड्या व्हिनिगरमध्ये भिजत ठेवाव्या. कांदा व लसूण बारीक चिरावी. गूळ चिरावा.

सफरचंदाचा कीस, मिरच्या (व्हिनीगरसकट), तिखट, मोहरी, गूळ, लिंबाची साल व रस, सुंठाची पूड व तमालपत्रे एका मोठ्या पातेल्यात एकत्र करून चुलीवर ठेवावे. झाकण असू द्यावे. पण अधूनमधून ढवळत राहावे.

मिश्रण मऊसर शिजले की उरलेले पदार्थ त्यात घालावे. मंद आंचेवर उकळू द्यावे. मधून ढवळावे. बुडाला लागू देऊ नये.

चटणी जॅमसारखी दाट झाली की पृष्ठभाग चकचकीत दिसू लागला की खाली उतरवावी. लगेच तमालपत्रे काढून टाकावीत.

स्वच्छ बाटल्या किंवा बरण्यामध्ये ही चटणी घालावी व झाकण लावून मेणाचे सील करावे.

Download MarathiMati.com's New Android App from Google Play