पाककला | Maharashtrian Recipes

सफरचंदाची चटणी | Chutney Recipes

साहित्य :

१ किलो मोठी दळदार आंबट सफरचंदे, ३०० ग्रॅम गूळ, २ मोठे चमचे बेदाणे ( थोडे कमी चालतील), २ मोठे चमचे मीठ, ३२५ मिली व्हिनीगर, ४-५ लाल सुक्या मिरच्या, अर्धा चमचा मोहरी, २ मोठे चमचे लिंबाचा रस, अर्धा चमचा किसलेली लिंबाची साल, १ कांदा, ६ लसूण पाकळ्या, ४ तमालपत्रे, २ चमचे सुंठीची पूड, अर्धा चमचा लाल तिखट

 

कृती :

सफरचंदाची साल बिया व गाभा काढून गर किसावा. लाल मिरच्या थोड्या व्हिनिगरमध्ये भिजत ठेवाव्या. कांदा व लसूण बारीक चिरावी. गूळ चिरावा. सफरचंदाचा कीस, मिरच्या (व्हिनीगरसकट), तिखट, मोहरी, गूळ, लिंबाची साल वरस, सुंठीची पूड व तमालपत्रे एका मोठ्या पातेल्यात एकत्र करून चुलीवर ठेवावे. झाकण असू द्यावे. पण अधूनमधून ढवळत राहावे. मिश्रण मऊसर शिजले की उरलेले पदार्थ त्यात घालावे. मंद आंचेवर उकळू द्यावे. मधून ढवळावे. बुडाला लागू देऊ नये. चटणी जॅमसारखी दाट झाली की पृष्ठभाग चकचकीत दिसू लागला की खाली उतरवावी. लगेच तमालपत्रे काढून टाकावीत. स्वच्छ बाटल्या किंवा बरण्यामध्ये ही चटणी घालावी व झाकण लावून मेणाचे सील करावे.

Visit MarathiMati.net

नवीन लेखन - मराठीमाती.नेट new

मराठी कविता

नुसताच प्रवास गांडुगिरीचा

लाटाच लाटा
आणि समुद्र टिंगल करतोय
येडझव्या प्रवाशांची
तू ही रे! तू ही रे! गाण्यावर
मुले हिंदकळताहेत
लॉंचच्या तोंडाशी
वर खाली उभे आडवी
एक लाट येते
मी ओक ओक ओकतोय
रात्रीच्य भर समुद्रात
आदल्या रात्रीचं अजीर्ण संमेलन.

Marathi Matrimony