संत्र्याची बर्फी
Santryachi Barfi
साहित्य :
- ६ मोठी संत्री
- ५०० ग्रॅम खवा
- ५०० ग्रॅम साखर
- १ संत्र्याची पाकवलेली साल
- पिवळा रंग
- थोडा केशरी रंग
- ५-६ वेलदोड्यांची पूड.
संत्री मधोमध कापून दोन भाग करावे. नंतर आपण मोसंबीचा रस काढतो तसा रस काढवा. खवा हाताने सारखा करावा.साखरेत संत्र्याचा रस घालून गोळीबंद पाक करा. नंतर त्यात केशरी रंग, वेलची पूड व संत्र्याची कुटलेली साल घाला. जरा ढवळून खाली उतरून घोटत राहा. चांगले घट्ट झाले की तूप लावलेल्या थाळीत ओतून थापा व वड्या पाडा.





