सानतंग न्यूडल्स

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १५ जानेवारी २००८

सानतंग न्यूडल्स

सानतंग न्यूडल्स - [Santang Noodles] मशरुम आणि पनीर असलेले सानतंग न्यूडल्स न्याहारी तसेच मधल्या वेळेच्या पदार्थावेळी खाऊ शकता.

जिन्नस


  • १/२ कप बारीक कापलेले गाजर
  • १/२ कापलेली काकडी
  • १/२ कप कापलेली शिमला मिरची
  • १ बारीक कापलेला कांदा
  • ६ तुकडे मशरूम
  • १/२ कप टोफु पनीर किंवा साधा पनीर
  • २०० ग्रॅ. सपाट न्यूडल्स (शेवया) जर उपलब्ध नसतील तर गोल न्यूडल्स चा उपयोग करू शकतात

पाककृती


न्यूडल्सला उकळते वेळी १ चमचा तेल टाकावे अणि जेव्हा उकळतील तेव्हा एका भांड्यात टाकावे.

आता भाज्यांना छोट्या छोट्या चौकोन तुकड्यांमध्ये कापावे आणि फ्राई कढईत तेल टाकुन फ्राय करावे. यात २ कप पाणी, चवीनुसार मीठ आणि काळी मिरची पावडर टाकावे.

आता यात २ चमचे सोया सॉस टाकावे घट्ट बनविण्यासाठी कार्नफ्लोर पेस्ट चा उपयोग कराव एक प्लेट मध्ये न्यूडल्स काढुन आणि वरून भाज्यांच्या मिश्रणास टाकावे.

तयार झाल्या मजेदार सानतंग न्यूडल्स स्वतः ही खा आणि इतरांस ही खाऊ घाला.