MarathiMati.com - Android App on Google Play Store

सांभर

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ७ जानेवारी २००८

सांभर

सांभर - [Sambhar] दक्षिण भारताची प्रसिद्ध आमटी म्हणजेच त्याला सांभर म्हणतात जी ईडली, डोसा, मेदुवडा तसेच भातासोबत खाल्ली जाते.

जिन्नस


 • २५० गॅम तुरडाळ
 • १/२ लहन चमचा मोहरी
 • १/२ लहान चमचा हळद पावडर
 • १ लहान चमचा धणे पावडर
 • ५० ग्रॅम चिंच
 • १/२ लहान चमचा गरम मसाला
 • १ लहान चमचा मेथीदाणा
 • १ लहान चमचा तांदूळ
 • १/२ लहान चमचा लाल मिरची पावडर
 • ४ कांदे
 • १ हिरवी मिरची
 • २ मोठे चमचे तूप
 • ४ टॉमॅटो
 • १ तुकडा आले
 • थोडीशी उडीद डाळ
 • थोडीशी चणाडाळ

पाककृती


तूरडाळ १ तास भिजवून नंतर मीठ, हळद टाकून कुकरमध्ये शिजवून घ्या. आता एका कढईत तेल-तूप न टाकता मेथीदाणा, उडीद डाळ, चणाडाळ, व तांदूळ भाजून घ्या.

गॅस बंद करून धणे पावडर व लाल तिखट टाकून ५ मिनीटे झाकून ठेवा. हे सर्व वाटून घ्या. कांदा, टॉमेटो, आलं व हिरवी मिरची बारीक चिरून घ्या.

एका कढईत तूप गरम करून मोहरीची फोडणी द्या. कांदा परतून, आलं, हिरवी मिरची, कढीपत्ता टाका. आता टॉमेटो टाकून नीट परतून घ्या.

सर्व मसाले टाकून भाजून घ्या व गॅस बंद करा. हे सर्व मसाले उकडलेल्या डाळीत मिक्स करा.

त्यानंतर डाळीला (सांभरला) उकळी काढून सर्व्ह करा.

MarathiMati.com - Android App on Google Play Store