पर्यावरणपूरक गणेशोत्सव | Eco-friendly Ganeshotsav

सांभर मसाला

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २ जानेवारी २००८

सांभर मसाला

सांभर करायच्या वेळीच हा सांभर मसाला (Sambhar Masala) ताजाच केला तरी चव अजून छान लागते.

जिन्नस


 • १२० ग्रॅम धणे
 • ८० ग्रॅम जीरे
 • ३० ग्रॅम काळी मिरी
 • ३० ग्रॅम सरसो
 • ३० ग्रॅम मेथी
 • २० ग्रॅम अख्खी लाल मिरची
 • ३० ग्रॅम हळद
 • १० ग्रॅम लसणाची पावडर
 • ६० ग्रॅम चण्याची डाळ
 • ६० ग्रॅम उडदाची डाळ
 • १० ग्रॅम हिंग
 • तळण्यासाठी तेल

पाककृती


दोन्ही डाळी धुवून वाळवून घ्या. कढईत तेल टाकून डाळी सोनेरी रंगापर्यंत भाजून घ्या.

डाळी कागदावर टाकून जास्तीचे तेल काढून घ्या.

वरील इतर सामग्री तेलात गरम करुन सर्व एकत्र कुटावे.

एका स्वच्छ व कोरड्या डब्यात भरुन ठेवावा.

सांभर करायच्या वेळीच हा मसाला ताजाच केला तरी चव अजून छान लागते.

Book Home in Konkan